प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 -पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीसाठी पहिल्या नियमित प्रवेश फेरीअंतर्गत कॅप व कोट्यातून एकूण 31 हजार 702 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
पुणे विभागात 317 कनिष्ठ महाविद्यालयांनी 1 लाख 11 हजार 430 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. यात कॅपच्या 86 हजार 888 तर कोट्याअंतर्गतच्या 24 हजार 542 जागांचा समावेश आहे. एकूण 1 लाख 2 हजार 703 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यातील 87 हजार 861 विद्यार्थ्यांनी अजॅ भरुन लॉक केले आहेत. यातील 41 हजार 510 अर्ज ऑटोव्हेरिफाइड करण्यात आले आहेत. मार्गदर्शन केंद्राद्वारे 45,852 विद्यार्थ्यांची पडताळणी झाली.
दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक
7 ऑगस्ट : प्रवेशाच्या रिक्त जागा दर्शवणार
9 ऑगस्टपर्यंत : नवीन विद्यार्थ्यांना अर्जा भाग-1 भरता येणार
10 ते 11 ऑगस्ट : डेटा प्रोसेसिंग होणार आहे.
12 ऑगस्ट : अलॉटमेंट जाहीर होणार आहे.
17 ऑगस्टपर्यंत : पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदत