एव्हरेस्टवर तब्बल 3 टन कचरा

काठमांडू – जगातील सर्वात उंच शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्टवरून या वर्षी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत सुमारे तीन टन कचरा उचलण्यात आला आहे. ही सफाई मोहिम 14 एप्रिलपासून नेपाळने सुरू केली आहे.

ही मोहीम सोलुखुंबु जिल्ह्यातील खुंबू पासनगलामू ग्रामीण पालिकेने सुरू केली होती. नेपाळी नववर्ष सुरू झाले त्यादिवसापासून म्हणजे 14 एप्रिलपासून 45 दिवस राबवली जाणारी एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम सुरू झाली. एव्हरेस्टवरून या मोहिमेंतर्गत 10 टन कचरा गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या संदर्भात पर्यटन महासंचालक दांडू राज घिमिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन टन कचरा गोळा करण्यात आला असून त्यातील दोन टन कचरा ओखालधुंगा येथे, तर एक टन कचरा काठमांडूला पाठवण्यात आला आहे. तीन टन कचरा उचलण्यात आला असून त्यामध्ये प्लास्टीक, बिअर बॉटल्स, कॉस्मेटीक कव्हरचा समावेश आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर कचरा पाठवण्यासाठी करण्यात आला आहे.

बेस कॅम्पवरून पाच हजार किलो तसेच दक्षिण भागातून दोन टन तर कॅम्प 2 व 3 भागातून तीन टन गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत माऊंट एव्हरेस्टवर पडलेले मृतदेहही परत आणण्याचा समावेश आहे. सर्व लोक या मोहिमेत सहभागी आहेत. चार मृतदेह बेसकॅम्पच्या ठिकाणी सापडले असून ते खाली आणण्यात आले आहेत. 23 दशलक्ष नेपाळी रुपये एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत खर्च होणार आहेत. 500 परदेशी गिर्यारोहक व 1000 सहायक या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)