परेश रावल आणि राबडीदेवी यांच्यात “ट्विटर वॉर’

नवी दिल्ली – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि भाजपचे खासदार परेश रावल यांच्यातलं ट्विटर युद्ध सध्या सोशल मीडियावर चांगलेच रंगले आहे. राबडी देवींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला परेश रावल यांनी उत्तर दिल्यानंतर शब्दांचे हे युद्ध आणखी भडकले. सोशल मीडियाच्या प्रभावानंतर राबडी देवी यांनी त्याचाच वापर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला. तर परेश रावल यांनीही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे.

अभिनेता अक्षयकुमारने घेतलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींना आंबा खाण्यावर प्रश्न विचारला होता. त्यावरून राबडी देवी यांनी मोदींवर टीका केली. राबडी देवी म्हणाल्या, पंतप्रधान काल मुजफ्फरपूर या लिचीच्या शहरात आले होते. तिथे लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की लिची खातात कशी, पण त्याचं उत्तर त्यांना देतात आलं नाही. कारण हा प्रश्न कुणा अभिनेत्यानं त्यांना विचारला नव्हता आणि तो प्रश्न पूर्वनियोजितही नव्हता.

या टीकेवर परेश रावल यांनी उत्तर दिले की, पर चारा तो कही भी कैसे भी खा सकते है. यावर राबडी देवी भडकल्या, त्यांनी पुन्हा ट्विट करून परेश रावल यांना उत्तर दिले. “चारा कसाही खाता येतो हे खरे असले तरी तुमच्या गुजराती काकाने लोखंडाचे राफेल विमान कसे, केव्हा, आणि कुठे खाल्ले हे कुणालाही कळाले नाही. ते अजब गुजराती काका आहेत.

निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप हे ठरलेलेच असतात. त्यामुळे प्रचारात रंगतही येते. निवडणुकीचा प्रचार जसा रंगत जातो तशी प्रचारालाही धार येते, याचे प्रत्यंतर या दोन नेत्यांच्या “ट्‌विटर वॉर’मधून मिळाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.