गंभीर गुन्ह्यातील ६ जणांच्या आवळल्या मुसक्या

कापूरहोळ: खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि खंडणी अशा गंभीर गुन्ह्यातील सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. आदित्य तानाजी चौधरी वय 19, संकेत महादेव कुंभार (दोघेही राहणार सासवड तालुका पुरंदर) अनिकेत महादेव काळे वय 19, सागर वसंत काळे( दोघेही राहणार करमाळा सोनोरी तालुका पुरंदर) अभिजीत विजय भिलारे (राहणार भिलारवाडी हातवे बुद्रुक तालुका भोर) व संतोष बाळासाहेब पवार वय 19 (रा. मुकादम वाडी तालुका पुरंदर )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आशिष शेंडकर, उद्धव शेंडकर यांना प्राणघातक हल्ला प्रकरणी सासवड पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी दिगंबर शेळके, आदित्य कळमकर सह इतर फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. दिगंबर शेंडकर आणि त्याच्या साथीदारांनी खंडणीसाठी महेश भैरवनाथ कामटे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामठे यांच्याकडील 2 हजारांची रोकड घेऊन पलायन केले होते.

9 डिसेंबर रोजी सायंकाळी चांबळी गावच्या हद्दीत ही घटना घडली होती. पंधरा दिवसांपूर्वी राजगडच्या हद्दीत अटक व फरारी आरोपींनी नसरापूर येथील शासन मान्य एका ताडीच्या च्या दुकानावर दरोडा घालून 46 हजारांचा ऐवज लंपास केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल मोरे रामेश्वर धोंडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर, श्रीरंग माळी, हवलदार राजू चंदनशीव, सचिन गायकवाड, जगदीश शिरसाट, रवींद्र शिनगारे अमोल शेडगे, ज्ञानदेव क्षीरसागर, दत्तात्रय तांबे, बाळासाहेब फडके, अक्षय नवले आदींनी ही कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.