“आम्ही लेकी सावित्रीच्या” या विषयावर काव्य संमेलन

पुणे : भारतातील आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, पुणे मराठी ग्रंथालय आणि स्वयं महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही लेकी सावित्रीच्या” या विषयावरील विद्यार्थिनी, महिलांचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ते शनिवार, २८ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान पुणे मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात (नारायण पेठ) होणार आहे.

या काव्य संमेलनात सहभागी इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी, महिलांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, महिला विषयक सद्यस्थितीवरील त्यांच्या कविता दि.२० डिसेंबर १९ पर्यंत योगिता साळवी (9594969638) व डॉ. सुनील भंडगे (9960500827) यांच्याकडे व्हॉट्सअपवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कवियत्रींना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.