‘मर्दानी २’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

मुंबई – ‘मर्दानी’ चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला आहे. चित्रपटात ‘राणी मुखर्जी’ एका करारी आणि डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत दिसून येत आहे. ‘मर्दानी २’ हा चित्रपट १३ डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झाला.

दरम्यान, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. प्रदर्शनच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.८० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारा भोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे.  ‘मर्दानी २’चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण राजस्थान मध्ये करण्यात आले आहे.  ‘यशराज फिल्म’च्या बॅनर खाली साकारण्यात येत असलेल्या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.