सोलापूर – सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ येथे एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दहाजण जखमी झाले आहेत.
पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना रुग्णवाहिकेने एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. एका मृतदेहाला घेऊन ही रुग्णवाहिका निघाली होती.
आमदार रवी राणांसह 16 कार्यकर्त्यांची दिवाळी तुरूंगात; नवनीत राणांचे तुरूंगाबाहेर धरणे आंदोलन
रवी राठोड (वय 38) व बुध्दीबाई चन्नापागूल (वय 45) अशी दोघा मृतांची नावे असून शववाहिका चालकाचे नाव समजू शकले नाही. हा अपघात सोलापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर मोहोळ येथे शववाहिका समोरील एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार आदळल्याने घडला.
पुण्यात रोजगारासाठी स्थायिक झालेल्या राठोड कुटुंबीयांतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतदेह हैदराबाद येथे मूळगावी नेताना शववाहिकेला अपघात होऊन त्यात एका महिलेसह तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दहा जण जखमी झाले आहेत.
भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा
पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरनजीक मोहोळ येथे शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.