टाटा स्टील प्लांटमध्ये ३ स्फोट; दोन कर्मचारी जखमी

नवी दिल्ली – लंडन येथील  वेल्समधल्या टाटा वर्क्स प्लांटमध्ये सलग तीन स्फोट झाल्याची माहिती मिळली आहे. ब्रिटनच्या वेगवेगळ्या मीडियाच्या रिपोर्टनुसार, प्लांटच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी स्फोटाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या देखील हादरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान प्लांटमध्ये लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. तर आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.