लखनौ – निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून पंतप्रधान मोदींच्या प्रचारासभांचा धडका पाहायला मिळत आहे.
आज पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यादरम्यान, पंतप्रधान मोदींसोबत जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांच्यासहीत एनडीएतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो केला. या रोड शोला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
#WATCH: PM Narendra Modi files nomination from Varanasi parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/ym9x2gCYYG
— ANI UP (@ANINewsUP) April 26, 2019