कोल्हापूर (प्रतिनिधी) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चालत आलेले मध्य प्रदेशचे 26 मजूर तसेच कर्नाटकातून चालत आलेल्या उत्तर प्रदेशच्या दोन जणांना कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या गावी पोहोचविले आहे.
सिंधुदुर्गमधून मध्य प्रदेशचे 26 मजूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पोलिसांना दिसून आले. तसेच उत्तर प्रदेशचे 2 मजूरही कर्नाटकमधून महामार्गावरून चालत जात होते. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस दलातर्फे फार्मसी कॉलेज उजळाईवाडी विमानतळ रोड येथील निवारा गृहांमध्ये दाखल केले होते. या निवारा गृहामध्ये त्यांची खाण्यापिण्याची सोय केली.
त्यानंतर उत्तर प्रदेशच्या दोन मजुरांना रेल्वेने त्यांच्या राज्यांमध्ये रवाना करण्यात आले. तसेच मध्य प्रदेशच्या 26 मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मध्य प्रदेश हद्दीपर्यंत रवाना केले. या मजुरांनी पोलीस दलाचे व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.