शिमला – हिमाचल प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह एकूण २७९ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मनालीमध्ये गेल्या २४ तासांत बर्फवृष्टी झाली.
हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, २० मार्चच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बंद करण्यात आलेल्या एकूण रस्त्यांपैकी सुमारे 96 टक्के रस्ते उंचावरील आणि आदिवासी भागातील आहेत.
यातील लाहौल आणि स्पीतीमध्ये जास्तीत जास्त २४९ रस्ते, चंबामध्ये ११ आणि किन्नौरमध्ये नऊ रस्ते बंद करण्यात आले. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार कुल्लू आणि मंडीमध्ये प्रत्येकी चार रस्ते,
कांगडा आणि शिमला येथे प्रत्येकी एक रस्ता रोखण्यात आला आहे. पाऊस व बर्फवृष्टीमुळे तब्बल २४६ ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले असून तीन पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत.राज्याच्या अनेक भागातील तापमान शुन्याच्या खाली गेले आहे.