हरयाणा – 12 वर्षीय मुलीसोबत छेडछाड करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 24 वर्षीय बॉक्सरची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. कामेश असे या बॉक्सरचे नाव आहे. कामेशने राज्य पातळीवरील बॉक्सीग केली आहे. हरयाणा मधील रोहतक मध्ये हा प्रकार घडला आहे. बॉक्सिंगशिवाय कामेश मॉडेलिंग आणि अभनियातही आपले नशीब अजमावत होता.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी कामेश आपल्या कुटुंबासोबत तेज कॉलनीमधील आपल्या नातेवाईकाकडे गेला होता. त्यावेळी तिथे काही तरुण 12 वर्षाच्या मुलीसोबत छेडछाड करत होते. कामेशने त्या तरुणांना असं कृत्य करु नका असं सांगितले. त्यानंतर त्यांच्यासोबत कामेशचं चांगलेच वाजलं. त्यानंतर आरोपींनी चाकूने भोकसून कामेशची हत्या केली. रोहतक पोलिसांत याघटनेप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रोहतक पोलिस उपाध्यक्षक गोरखपाल म्हणाले की, आरोपींनी अचानक चाकू काढून कामेशवर वार केले. जखमी अवस्थेत कामेशला उपचारासाठी रोहतकमधील पीजीआयएमएस रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान कामेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयपीसी कलम 148, 149 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.