सणबूर – पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील ग्रामीण मार्गांचे दुरुस्ती, लघु पाटबंधाऱ्यांचे विविध कामांसाठी, साकव पुलासाठी असा एकूण चार कोटी 87 लाख 89 हजार, तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास योजनेंतर्गत एकूण 18 कोटी 7 लाख 42 हजार असा एकूण सुमारे 23 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
यामध्ये सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयात जि.प. बांधकाम विभागाकडील चार ग्रामीण मार्ग सुधारणा करण्यासाठी डेरवण-कोळेकरवाडी 20 लाख, नाव-गोवारे 20 लाख, सोनवडे-खांडेकरवाडी 30 लाख, डावरी 35 लाख, तसेच लघु पाटबंधाऱ्यांचे 13 कामांमध्ये जुंगठी-दिवशी खुर्द साठवण हौद व शेती आडवे पाट 14.43 लाख, जुगाईवाडी घोट पाट व पाईप लाईन 10.08 लाख, घाणबी साठवण हौद 25.08 लाख, वेखंडवाडी शेतीसाठी आडवे पाट 19.95 लाख, सडावाघापूर ग्रामतलाव 10.28 लाख, कळंबे पाझर तलाव 30.33 लाख, खराडवाडी-बामणकी बंधारा व आर.सी.सी.पाट 24.17 लाख, केळेवाडी-कडवे पाट 21.09 लाख,
पाडळोशी-मसुगडेवाडी वळण बंधारा व पाट 14.16 लाख, मेंढोशी वळण बंधारा 8.87 लाख, पाबळवाडी पाट 14.79 लाख, आवर्डे वस्ती वळण बंधारा व वितरण 10 लाख व वनकुसवडे आर.सी.सी.साठवण हौद व पाट 18.07 लाख, तर साकव कामांमध्ये वेखंडवाडी-चोरजवाडी 50 लाख, सोनाईचीवाडी येथे सोनाईचीवाडी-गारवडे 60 लाख, वाटोळे येथे पाबळ ओढया 51.59 लाख या तीन साकवच्या कामांचा समावेश आहे. दरम्यान, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून ग्रामीण मार्ग दुरुस्ती, लघु पाटबंधाऱ्यांची कामे व सर्वसाधारण साकवच्या कामांना भरघोस निधी मंजूर झाला असल्याने डोंगरी व दुर्गम भागातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
तसेच मतदारसंघातील गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी एकूण 18 कोटी 7 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये रस्ता सुधारणा व देखभाल दुरुस्तीसाठी टी.आर.16 आंबवणे 274.88 लाख, हुंबरपेढा-ढेरुगडेवाडी 288.17 लाख, सुतारवाडी-मोरेवाडी-मालदन 142.41 लाख, नाणेल पोहोच रस्ता 604.11 लाख, तामिणे पोहोच रस्ता 188.21 लाख, तर जंगमवाडी 309.64 लाख असा 6 रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 18 कोटी 7 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मंजूर कामे तातडीने सुरु करण्याच्या सुचना पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या आहेत.