- 65 जणांचा मृत्यू
- 2183 रुग्ण करोनामुक्त
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासांत नवीन 2148 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 2183 रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आज दिवसभरामध्ये 65 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत 2 लाख 21 हजार 448 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी (दि. 5) शहरात 2148 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
आजपर्यंत शहरातील 2 लाख 21 हजार 448 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 65 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 41 व शहराबाहेरील 24 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत 4777 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 3173 व शहराबाहेरील 1604 जणांचा समावेश आहे.
दिवसभरामध्ये 2183 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 96 हजार 674 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 11759 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 7858 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 13,042 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 20900 इतकी आहे.
मावळात 139 करोनाबाधित रुग्ण
मावळ तालुक्यात बुधवारी (दि. 5) 139 रुग्णांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात दिवसभरात 125 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरी भागात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आज मावळात एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1652 आहे. शहरी भागात 91 तर ग्रामीण भागात 48 रुग्ण आज मिळून आले आहेत. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत 90 रुग्ण सापडले आहेत. लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीत 1 रुग्ण सापडला आहे. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 14,747 झाली आहे. तर दिवसभरात 125 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.
तळेगाव नगर परिषद हद्दीत सर्वाधिक 5025, लोणावळा नगर परिषद हद्दीत 2820 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 823 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 8668 रुग्ण तर ग्रामीण भागात 6079 रुग्ण आढळून आले आहेत. 7 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. करोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.63 टक्के आहे. तर मृत्यू दर 2.16 टक्के आहे. सद्यःस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये 539, लोणावळा नगरपरिषदेमध्ये 289, वडगाव नगरपंचायतमध्ये 58 व ग्रामीण भागात 766 असे एकूण 1652 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.