पुणे -पुणे परिमंडलातील 7 लाख 88 हजार 881 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे 191 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 6 लाख 81 हजार 208ग्राहकांकडे 121 कोटी 81 लाख, वाणिज्यिक 96 हजार 316 ग्राहकांकडे 47 कोटी 3 लाख व औद्योगिक 11 हजार 357 ग्राहकांकडे 22 कोटी 35 लाख रुपयांची थकबाकी आहे.
दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि.27) व रविवारी (दि. 28) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन सोय उपलब्ध आहे.
पुणे शहरात घरगुती 3 लाख 2 हजार 232 ग्राहकांकडे 48 कोटी 18 लाख, वाणिज्यिक 48 हजार 352 ग्राहकांकडे 19 कोटी 78 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 139 ग्राहकांकडे 2 कोटी 34 लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
घरगुती – 121 कोटी 81 लाख
वाणिज्यिक – 47 कोटी 3 लाख
औद्यागिक-22 कोटी 35 लाख