तरुणास मारहाण करून 18 हजारांस लुटले

नगर – नगर- औरंगाबाद महामार्गावरील कविजंगनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुणाला मारहाण करुन अठरा हजाराचा ऐवज लांबविण्यात आला. ही घटणा रविवार रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात तिघा व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कविजंगनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दि. 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधलेल्या व बुलेटवरून आलेल्या तिघाजणांनी जुबेर जावीद शेख (रा. काशिनाथ भवानीपेठ, पुणे) यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. व बळजबरीने त्यांच्याजवळील रोख रक्‍कम, मोबाईल, चांदीचे ब्रेसलेट असा सुमारे 18 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. जुबेर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी अज्ञात तिघांजणांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.