चिखलीतील आणखी एक एटीएम फोडले

पिंपरी  (प्रतिनिधी) – गॅस कटरने कापून आणखी एक एटीएम फोडले. हा प्रकार चिखली येथे मंगळवारी (दि.१९) पहाटे उघडकीस आला.

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्याच आठवड्यात अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिस गस्त घालत असताना पहाटेच्या सुमारास आयडीबीआय बँकेचे एटीएम शटर लावून बंद असल्याचे पोलिसांना दिसून आले.

पोलिसांना शंका आल्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता एटीएम मशिन गॅस कटरने कापलेले दिसून आले. हे एटीएम गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच एटीएममध्ये कोणतीही रोकड नसल्याचे पोलिसांना बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.c

Leave A Reply

Your email address will not be published.