राहाता – नाताळ सुट्टीत 25 डिसेंबर ते 3 जानेवारी याकालावधीत साईबाबांच्या दानपेटीत 17.81 कोटींचे दान तर सुमारे 8 लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त शिर्डीत आलेल्या भाविकांनी दर्शन घेत दान केले. महोत्सवाच्या कालावधीत दानपेटीतून 8 कोटी 78 लाख 79 हजरी 4 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 67 लाख 67 हजार 69 रुपये, डेबीट क्रेडीट कार्डद्वारे 2 कोटी 15 लाख 18 हजार 493 रुपये, ऑनलाईन देणगीद्वारे 1कोटी 21 लाख 2 हजार 531 रुपये, चेक/डिडीद्वारे 98 लाख 79 हजार 973 रुपये व मनी ऑडरद्वारे 3 लाख 21 हजार 653 रुपये अशी एकूण 16 कोटी 84 लाख 69 हजार 396 रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहते. तसेच सोने 1 किलो 849 ग्रॅम (90 लाख 31 हजार 167 रुपये) व चांदी 12 किलो 696 ग्रॅम (6 लाख 11 हजार 478 रुपये) देणगी प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातून एकूण 17 कोटी 81 लाख 12 हजार 41 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.
शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत सुमारे 8 लाख साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश आहे. ऑनलाईन व सशुल्क दर्शन/आरती पासेसद्वारे 1 लाख 91 हजार 135 साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. याद्वारे 4 कोटी 5 लाख 12 हजार 542 रुपये प्राप्त झालेले आहे. याकालावधीत साईप्रसादालयात 5 लाख 70 हजार 280 साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर 1 लाख 11 हजार 255 साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच 8 लाख 54 हजार 220 लाडूप्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली. याद्वारे 1 कोटी 32 लाख 19 हजार 200 रुपये प्राप्त झालेले आहे. साईआश्रम भक्तनिवास, द्वारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांद्वारे 1 लाख 28 हजार 52 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तर अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात 16,207 साईभक्तांची अशी एकूण 1 लाख 44 हजार 259 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आलेली होती. याकालावधीत 171 साईभक्तांनी रक्तदान केलेले आहे.