महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हं; 18 नगरसेवकांनी काॅंग्रेसचा “हात’ सोडत बांधलं राष्ट्रवादीचं “घड्याळ’

मुंबई – भिवंडीमध्ये काॅंग्रेसला धक्का बसला आहे. येथील तब्बल 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला.

भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीपासून काॅंग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू होता. याच वादातून आता काॅंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीत अंतर्गत वाद होऊ नये म्हणून सुरूवातीला शरद पवार यांनी त्यांच्या प्रवेशाला नकार दर्शवला होता. मात्र, अखेर या नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

भिवंडीतील काॅंग्रेसच्या नगरसेवकांसह आज दौंड येथील रासपच्याही काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून माहिती देण्यात आली आहे. या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे बळ वाढले आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.