नगर -जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल 31 व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवला प्राप्त झाले असून सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नगरकरांना एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे. मात्र आज पाठविण्यात आलेल्या पाच अहवालाची प्रतिक्षा आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 513 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1 हजार 431 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्हव आले आहेत.
जामखेडमध्ये काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले करोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही करोनाची लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्ह्यातील करोना बाधीत व्यक्तींची संख्या आता 43 झाली आहे. त्यापैकी 24 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आणखी जामखेड येथील संपार्कात आलेल्या पाच जणांच्या अहवालाची प्रतिक्षा नगरकरांना आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यास नगरकरांना दिलासा मिळणार आहे.