15 कोटी मुस्लिम 100 कोटी हिंदूंना भारी; वारीस पठाणचे वादग्रस्त वक्तव्य

‘एआयएमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांचा फुत्कार

गुलबर्गा : ‘एआयएमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आम्ही 15 कोटी आहोत, परंतु 100 कोटींना भारी आहोत, असे बेताल वक्तव्य त्यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे जाहीर सभेत बोलताना केले आहे. यावेळी  ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हे देखील उपस्थित होते. “का” कायद्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शना ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य केले.

ते पुढे म्हणाले, “केवळ शब्दाला शब्दांनी उत्तर देता येणार नाही, ‘इट का जवाब पत्थर से’ आता आम्ही शिकलोय. आम्हाला सोबत चालावे लागेल. स्वातंत्र्य मागितल्याने मिळत नाही, ते हिसकावून घावे लागते”.

“आम्ही आत फक्त महिलांना पुढे केले आहे, सगळ्या वाघिणी बाहेर निघाल्या तरी तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही जर सगळे सोबत आलो तर काय होईल? या पूर्वीही असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.