कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी आयुष मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी आयुष मंत्रालयाने एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
या हेल्पलाइनवरून कोविड -19 रूग्णांना आलेल्या समस्या, आव्हाने सोडविण्यासाठी आयुष आधारित या क्रमांकावर उपाय सुचविले जाणार आहेत.
हा टोल फ्री नंबर 14443 असा असून कोरोनाग्रस्तांचे या नंबरवरून समुपदेशन केले जाणार आहे.
AYUSH ministry operationalises toll-free COVID-19 counselling helpline number 14443. It will be available pan-India from 6 am till midnight on all days of the week.
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2021
आयुष मंत्रालयाने कोरोना साथीच्या दरम्यान हेल्पलाईन क्रमांक 14443 जारी केला असून हा क्रमांक पूर्णपणे टोल फ्री आहे. कोरोनाशी संबंधित माहिती आणि प्रश्नांसाठी हा क्रमांक असणार आहे. कोरोना समुपदेशन हेल्पलाइन आठवड्यात सर्व दिवस सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण भारतभर उपलब्ध असणार आहे. यासंदर्भातील माहिती आयुष मंत्रालयाने दिली आहे.
होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार, युनानी आणि सिद्ध असे आयुषच्या विविध प्रकारचे तज्ज्ञ नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी या क्रमांकावर उपलब्ध असतील. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हे तज्ज्ञ रूग्णांना केवळ समुपदेशन आणि व्यावहारिक उपचारच देणार नाहीत, तर त्यांना जवळपास आयुष सुविधा उपलब्धतेबाबत मार्गदर्शन करणार आहे.
हेल्पलाइन इंटरएक्टिव व्हॉईस प्रतिसादावर आधारित आहे. सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ही हेल्पलाईन उपलब्ध आहे. इतर भाषा कालांतराने जोडल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही हेल्पलाइन सुरुवातीला एकाच वेळी १०० कॉल उचलणार आहे.
तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार या हेल्पलाईनवर येणाऱ्या कॉल्सची क्षमता वाढविली जाणार आहे, असे आयुष मंत्रालयाकडून सांगितले गेले आहे. आयुष प्रणाली ही आरोग्य आणि लोकांच्या उपचारांसाठी वापरली जाणारी सर्वात जुनी वैद्यकीय प्रणाली आहे. तसेच देशात या वैद्यकीय प्रणालीला औपचारिक मान्यता प्राप्त मिळाली आहे.