नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र सद्ध्या बघायला मिळत आहे. असे जरी असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता असून हा चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात आयुष मंत्रालयाकडून लहान मुलांसाठी नवीन गाईडलाईन तयार करण्यात आल्या आहेत.
आयुष मंत्रालयाच्या लहान मुलांसाठीच्या या नवीन गाईडलाईनमध्ये आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांसोबत मास्क वापरणे, योग करणे, डॉक्टरांच्या संपर्कात राहणे असे काही सल्ले देण्यात आले आहेत.
नवीन गाईडलाईन
१. कोणत्याही वस्तूला हात लावल्यावर मुलांना हात धुण्यास सांगा.
२. घराबाहेर पडताना मास्क आवश्यक घाला
३. लहान मुलं हात धुण्यास, मास्क घालण्यास टाळाटाळ करत असतील तर त्यांना या मागचं कारण प्रेमाने समजवा.
४. ५ ते १८ वयोगटातील मुलांनी मास्क वापरण अत्यंत गरजेचं आहे.
५. २ ते ५ या वयोगटातील मुलांची इच्छा असेल तेव्हाच त्यांना ते घाला. तसंच त्यांनी मास्क घातल्यानंतर त्याच्याकडे पालकांनी लक्ष द्या.
६. नॉन मेडिकल किंवा तीन लेअर असलेल्या सुती कपड्याचा मास्क मुलांसाठी योग्य आहे.
७. गरज नसतांना मुलांना घराबाहेर पाठवू नका.
८. लहान मुलांना शक्यतो व्हिडीओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातूनच इतरांच्या संपर्कात ठेवा.
९. जर मुलांमध्ये कोविड संसर्गची लक्षण आढळल्यास त्यांनी घरातील वृद्धांपासून दूर ठेवा.