बारामती -शहर व तालुक्यात दिवसभरात 13 करोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. बारामतीत करोना संक्रमित रुग्णांची संख्या 103 इतकी झाली आहे. (दि.22) एकूण 59 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 42 नमुन्यांचा अहवाल सुरुवातीला प्राप्त झाला होता. त्यामध्ये 11 जणांना कोणाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.
गुरुकुल सोसायटी शिवनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा तसेच जामदार रोड कसबा येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा व मुक्ती अपार्टमेंट कसबा येथील एक जणांचा, खंडोबानगर दत्त मंदिराजवळ येथील दोन, मारवाड पेठ येथील एक जणांचा व ख्रिश्चन कॉलनीतील एक रुग्ण
आढळून आला.
त्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या 17 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये शहरातील देसाई इस्टेटमधील 56 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. कुरणेवाडी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एका 60 वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज एकूण 13 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. करोना संक्रमित रुग्णांचा समावेश आहे. शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणास्तव घराबाहेर बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.