शिक्रापूर -शिक्रापूरसह परिसरात काही केल्या करोनाचा साखळी तुटतच नाही. गुरुवारी (दि. 23) पुन्हा तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे बुधवारी (दि. 22) सकाळच्या सुमारास एका खासगी डॉक्टरासह सात जणांना करोनाची लागण झाली होती. तर गुरुवारी इको ग्राम सोसायटीत राहणाऱ्या आणि सणसवाडी येथील एका कंपनीमध्ये कामाला असलेल्या युवकाला तर 24 वा मैल व करंजेनगर येथील दोघांनी खबरदारी म्हणून केलेल्या तपासणीमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्ण राहत असलेल्या परिसरात जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केले.
तर या तिघांच्या संपर्कातील 14 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.