लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेची महामेट्रोकडे मागणी
123 कि.मी. सुचवलेल्या एकूण मेट्रो मार्गांची लांबी
पुणे – शहरातील 12 रस्त्यांवर मेट्रो सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि पुणे महानगरपालिकेने महामेट्रोकडे केली आहे. यामध्ये प्रामुख्याने डेक्कन ते खडकवासला, चांदणी चौक ते कात्रज, स्वारगेट ते हडपसरसह अन्य मार्गांचा समोवश आहे. या मेट्रो मार्गांची लांबी ही 123 किमी आहे.
शहरात महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी, निगडी ते शिवाजीनगर, तर पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. या प्रकल्पांच्या विस्ताराची मागणी होत आहे. वनाझऐवजी चांदणी चौकापासून मेट्रो सुरू करावी. तसेच रामवाडीपर्यंत धावणारी मेट्रो पुढे वाघोलीपर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे मनपाकडून रामवाडी ते लोहगाव विमानतळ, पुणे स्टेशन ते कात्रज, कात्रज ते शिवणे आणि वनाझ ते चांदणी चौक असे चार मार्ग सुचवण्यात आले आहेत. तर लोकप्रतिनिधींनी आठ मार्गांवर मेट्रो सुचवली आहे.
सुचवलेले मेट्रो मार्ग आणि अंतर
वनाझ – रामवाडी मेट्रो चांदणी चौकापर्यंत – 1.5 कि.मी.
एसएनडीटी कॉलेज ते वारजे – 7 कि.मी.
स्वारगेट ते खडकवासला – 13 कि.मी.
शिवाजीनगर न्यायालय ते हडपसर – 9 कि.मी.
रामवाडी ते वाघोली – 12 कि.मी.
रामवाडी ते लोहगाव विमानतळ – 2.5 कि.मी.
कात्रज ते वारजे / शिवणे – 13 कि.मी.
खडकवासला ते सिंहगड – 18 कि.मी.
पुणे स्टेशन ते कोंढवा- कात्रज – 14 कि.मी.
चांदणी चौक ते कात्रज – 11.5 कि.मी.
डेक्कन ते खडकवासला – 11.5 कि.मी.