ओडिशा रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या अपघतात २८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक जण जखमी झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला आहे. अद्यापही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून २ लाख रुपये, तर रेल्वे मंत्रालयाकडून १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची मदत –
या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांंना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचबरोबर या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “हा अपघात दुर्दैवी असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये, तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.”
PMO कडून मदत जारी –
पीएम मोदींनी ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीएमओने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. “ओडिशा ट्रेन अपघातात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नतेवाईकांना पीएमएनआरएफकडून २ लाख रुपयांची मदत केली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली जाईल.”
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the train mishap in Odisha. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 2, 2023
नेमकं काय घडलं?
ओडिशातील बहानगा गावाजवळ हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. त्यानंतर अचानक या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली. यातच २८० जणांचा मृत्यू झाला आणि ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडला. या घटनेनंतर मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी –
हावड़ा- 033 – 26382217
खरगपूर – 8972073925, 9332392339
बालासोर- 8249591559, 7978418322
शालीमार (कोलकाता) – 9903370746
रेलमदद – 044- 2535 4771