जुन्नर (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात सोमवारी (दि. 3) 12 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे बाधितांची एकूण संख्या 475 झाली आहे. मागील आठवड्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली होती; मात्र गेल्या पाच दिवसांपासून बाधित रुग्ण आढळण्याची संख्या पुन्हा वाढत असून रुग्णांची संख्या 500 कडे वेगाने जात आहे.
सोमवारी आळे 2, ओतूर 2, उंचखडक 2 तर पारुंडे, शिंदेवाडी (वरुंडी), वडगाव कांदळी, शिरोली तर्फे आळे, वारूळवाडी व बेल्हे या गावांत प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी दिली.
तालुक्यातील 475 रुग्णांपैकी 330 व्यक्ती उपचारानंतर बरे झाले असून 125 ऍक्टिव्ह आहेत. दरम्यान बेल्हे येथील एक वयोवृद्ध पुरुष आणि आळेफाटा येथील एका वृद्ध करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे एकूण करोनाबळींची संख्या 20 झाली आहे.