पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रश्नपेढीचा वापर करून विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येणार आहे.
मागील वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्याक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना काही अडचणी निर्माण होऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेच्या बाबतची भिती कमी व्हावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज यावा यासाठी एससीईआरटीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली होती. करोनाचे संकट आटोक्यात आल्यामुळे सन 2022-23 हे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू झाले. यामुळे शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीपर्यंत एससीईआरटीच्या संकेतस्थळावर गेल्या वर्षीच्याच प्रश्नपेढी दिसत होती. त्यामुळे यंदा प्रश्नपेढी मिळणार की नाही असा प्रश्न विद्यार्थी-पालकांसमोर निर्माण झाला होता. अखेर एससीईआरटीने यंदा दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के अभ्यासक्रमावरील विषयनिहाय प्रश्नपेढी तयार केल्या आहेत. या प्रश्नपेढ्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेता येणार आहेत.
प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://www.maa.ac.in/