पुणे – दिवसभरात 1082 करोना बाधितांची नोंद झाली असून, गेल्या पाच सहा दिवसांच्या तुलनेत ती कमी आहे. डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या गेल्या 24 तासांत 678 असून, एकूण बरे झालेल्यांची संख्या आता 2 लाख 02 हजार 339 आहे.
बाधित असलेल्या 2 लाख 19 हजार 285 रुग्णांपैकी 11 हजार 984 रुग्ण ऍक्टीव्ह असून त्यातील 370 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 776 जण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात 11 जणांचा मृत्यु झाला असून, त्यातील एक बाधित पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत 4962 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 7 हजार 266 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली असून, आजपर्यंत 12 लाख 55 हजार 652 जणांची स्वॅबटेस्ट करण्यात आली आहे.