सांगली -जिल्ह्यात आणखी तीन व्यक्तींचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बाधित मुलीची 26 वर्षीय आई, मुंबईहून गोरेवाडी (ता. खानापूर) येथे आलेली 45 वर्षीय व्यक्ती व नवी मुंबईहून नेर्ली (ता. कडेगाव) येथे आलेली 57 वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आली आहे.
जिल्ह्यातील बाधित सहा व्यक्ती गुरूवारी करोनामुक्त झाल्या. शुक्रवार सायंकाळअखेर एकूण करोनाबाधित व्यक्तींच्या संख्येचे शतक, तर करोनामुक्त व्यक्तींच्या संख्येचे अर्धशतक झाले आहे.
जिल्ह्यात एकूण करोना बाधितांची संख्या 101 झाली आहे. बाधित रुग्णांपैकी चार व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे. करोनामुक्त झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या 54 झाली आहे.