वाल्हे – पुरंदर तालुक्यातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तर सोमवारी (दि. 31) तालुक्यामध्ये तब्बल 100 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.
यामध्ये 90 जणांचे शासकीय तर 10 जणांचे खासगी अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सरनोबत यांनी सांगितले.
मागील पाच दिवसांमध्ये तब्बल 273 जण करोना पॉझिटीव्ह आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.