धमातरी – छत्तीसगडमध्ये धमातरी जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला.
रविवारी रात्री घोरागाव गावाच्या जंगल परिसरात ही चकमक झाली. त्या परिसरात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची बाब समजल्यानंतर जिल्हा सुरक्षा गार्डच्या वतीने तेथे शोध मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी ही चकमक झाली.
ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव रवी असे असल्याचे समजले आहे. तो माओवाद्यांच्या कोब्रा गटात कार्यरत होता. त्याचे अन्य साथीदार मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जंगलातून पसार झाले. त्यांचा शोध पोलिसांनी सुरूच ठेवला आहे.
माओवाद्यांचा गट याच भागात प्रामुख्याने कार्यरत असतो. त्या गटाचा म्होरक्या नेमका कोण आहे हे मात्र अजून पोलिसांना समजलेले नाही.