बदनामीच्या बहाण्याने दहावीतील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे – बदनामी करणाऱ्याची धमकी देत दहावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या क्‍लासमध्ये करीअर विषयक मार्गदर्शन करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्ययाधीश ए.एन.सिरसीकर यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही न्यायालयात आदेशात म्हटले आहे.

प्रितेश रेवणसिध्द चौधरी (वय 31, रा. निगडी) असे त्याचे नाव आहे. याबाबत पीडित 15 वर्षीय मुलीच्या आईने हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणत सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले.

नोव्हेंबर 2016 आणि 24 डिसेंबर 2015 रोजी ही घटना घडली. पीडित दहावीत शिकत होती. ती एका संस्थेत करीअर मार्गदर्शन क्‍लासला जात होती. तिथे तो मार्गदर्शन करण्यासाठी जात असत. त्याने तिच्या कुटुंबियांचीही ओळख वाढवली होती. बदनामी करण्याच्या अमिषाने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील संजय पवर यांनी केली. त्यानुसार बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भादवी कलम 506 नुसार न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.