कर्जतमध्ये पत्नीसह दोन मुलांची हत्या करुन डॉक्टरची आत्महत्या;सुसाईड नोटमध्ये सांगितले धक्कादायक कारण

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील राशीन गावात पत्नीसह दोन मुलांना मारुन डॉक्टरने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. मुलाचे आजारपण सहन होत नसल्याने एका नामवंत डॉक्टरने त्याची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना राशीनमध्ये घडली आहे.

राशीनमधील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईन द्वारे इंजेक्शन देऊन स्वत: गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

दरम्यान ज्या खोलीत त्यांचे मृतदेह आढळले त्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिठ्ठी देखील लावली होती. त्या चिठ्ठीत डॉक्टरांनी असे लिहिले आहे की, ‘माझा थोरला मुलगा कृष्णा याला ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराधासारखे वाटत आहे. अनेक दिवसापासून आम्ही यामुळे व्यथित होतो.’

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की,’कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे दु:ख आम्ही आई-वडील म्हणून सहन करू शकत नाही. त्यामुळे मी आणि माझी पत्नी वर्षा आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हे योग्य नसेल तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहोत. त्यात कुणालाही जबाबदार धरू नये.’ दरम्यान एका प्रतिष्ठित डॉक्टर कुटुंबांने असे पाऊल उचलल्याने अनेकांच्या मनात संशय देखील निर्माण झाला आहे. मुलाला ऐकू येत नसल्यामुळे डॉक्टर कुटुंबाने आत्महत्या केली, असे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात आता ही आत्महत्या आहे की घातपात याचा कसून तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.