-->

“टोल नाका आला की टेंशन येतं..’ फास्टॅग मुळे गीतकार संदीप खरेंना बसला फटका; प्रशासनाला केली विनंती…

पुणे – भारतात आजही डिजिटायझेशन केवळ २७ टक्‍केच झालेले असताना आणि सर्वत्र देशभर डिजिटल पेमेंटसह रोखीने व्यवहाराची परवानगी असताना देशभरातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांसह सर्वत्रच टोलची रक्‍कम फास्टॅग नावाच्या यंत्रणेद्वारे ऑनलाइन भरण्याची सक्‍ती केंद्र सरकारने केली आहे.

१५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सर्व वाहनचालकांना टोलनाक्यांतून जाण्यासाठी ‘फास्टॅग’ची सक्ती करण्यात आली आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी सरकारकडून ही  सेवा सुरु करण्यात आली असली तरी अवघ्या दोन-तीन दिवसांमध्येच फास्टॅगच्या सेवेत अनेक त्रुटी जाणवू लागल्या आहे. तांत्रिक अडचणींमुळे या सेवेसाठी पूर्वीप्रमाणेच वेळ वाया जात असल्याचा अनुभव प्रसिद्ध आणि गीतकार संदीप खरे यांनी सांगितला आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandeep Khare (@sandeepkhareofficial)

संदीप खरे यांनाही कोल्हापूर-पुणे प्रवासात असाच वाईट अनुभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन त्यांनी प्रशासनाने काहीतरी उपाय शोधावा अशी विनंती केली आहे. गुरुवारी सकाळी कोल्हापूर-पुणे महामार्गावरील किणी टोलनाक्यावर घडलेला प्रकार त्यांनी सांगितला. तसंच, “टोल नाका आला की टेंशन येतं… इतके दिवस गर्दीचं… आता गर्दी फास्ट टॅग चं !’ या असं कॅप्शन सुद्धा संदीप यांनी दिलं आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.