रांजणगाव गणपती – येथील पोलीस स्टेशन हद्दीतून गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री करणाऱ्या 10 जणांना तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली.
यामध्ये अवैध व्यवसाय करणारे बन्सीलाल मोहनलाल मीना, ज्योतीराम पांडुरंग कांबळे, भागिनाथ दशरथ शेलार, आकाश मारुती कांबळे, जितेंद्र लाला जगताप, सागर प्रभाकर नवले (सर्वजण रा. कारेगाव), रुपेश भाऊसाहेब पाचंगे, भरत पोपट पाचंगे (रा. ढोकसांगवी) राहुल बाळासाहेब वाघ, अशोग बबन गिरे (रा. रांजणगाव गणपती) या दहा जणांना 4 सप्टेंबर 2020 पर्यंत शिरूर तालुक्यातून हद्दपार करण्यात येत असल्याचे आदेश दौंडचे प्रभारी उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी दिले आहेत.