पुणे : इम्प्रेस गार्डन येथील डाव्या कालव्याजवळ दारू पित बसलेल्या काही जणानी किरकोळ कारणावरुन एका तरुणाचा खुन केला. यानंतर त्यास कालव्यातील पाण्यात ढकलुन दिले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
दरम्यान, मुलीच्या छेडछाडीवरुन खुनाचा प्रकार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आयान जावेद गणपूरे(17,रा.लोहियानगर) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक ए.ई.शेटे यांनी दिलेल्या माहितीनूसार ही घटना दुपारच्या सुमारास घडली. त्याची माहिती पोलिसांना सायंकाळी कळाली. हा प्रकार मुलीच्या छेडछाडीवरुन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील गुन्हेगार निष्पन्न झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयान व त्याचे मित्र इम्प्रेस गार्डनजवळ असलेल्या कालव्याजवळ दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली. यावेळी त्याच्या साथीदारानी त्यास बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांनी त्यास कालव्यात ढकलुन दिले. ही माहिती वानवडी पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अयानचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढून ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.