सलमान पाया पडला तरी….

सलमानने कमाल खानला न्यायालयात ओढले. त्याच्यावर मानहानीचा दावा दाखल केला. प्रकरणाची सुनावणी झाल्यावर सलमानच्या विरोधात तू काही बोलायचे नाही अशा आशयाची तंबी त्याला न्यायालयाने दिली.

त्यानंतर तो दोन दिवस गप्प बसला व पुन्हा सलमानच्या विरोधात शेरेबाजी सुरू केली.मुळात त्याने सलमानच्या राधेबद्दल काही लिहिले म्हणून त्याला कोर्टात खेचलेले नाही,

तर त्याने सलमानबद्दल, पैशांबद्दल आणि त्याच्या बीईंग ह्युमन फाउंडेशन या संस्थेबद्दल अनावश्‍यक, दिशाभूल करणारी टिप्पणी केल्यामुळे त्याला कोर्टात खेचले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कमाल म्हणतो की जे निर्माते, कलाकार त्यांच्या चित्रपटाची समीक्षा करण्यास त्याला मनाई करतात, त्यांच्या चित्रपटांचे समीक्षण तो करत नाही.

मात्र सलमानच्या बाबतीत तसे होणार नाही. त्याने मला मनाई केली, येऊन माझ्या पाया पडला तरी त्याच्या चित्रपटांचे समीक्षण मी करणार. इतकेच काय त्याच्या चित्रपटातील प्रत्येक गाण्यांचेही समीक्षण करणार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.