राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान
मंचर- करोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वयंप्रेरणेने व स्वखुशीने “मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी 1 कोटींच्या मदतीचा धनादेश मुंबई येथे आज (दि. 2) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपूर्द केला.
करोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या लढ्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 2 हजार 500 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने व स्वखुशीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी 1 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. या जमा केलेल्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कामगार आणि उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी मुंबई येथे सुपुर्द केला.