नवी दिल्ली: राजस्थान मधून दिल्लीत आलेल्या ओव्हरलोड ट्रकला तब्बल दीड लाख रुपयाचा दंड न्यायालयाने ठोठावला. नव्या वाहतूक नियमानुसार हा दंड आकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका खासगी वाहतूक संस्थेने राजस्थान मधून दिल्लीला क्षमतेपेक्षा अधिक माल पाठविला. पोलिसांनी आणि आरटीओनी केलेल्या कारवाईत हि बाब उघड झाली. वाहनमालकाला रोहिणी न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने एक लाख ४१ हजार सातशे रुपयांचा दंड ठोठावला.
Delhi: A truck owner from Rajasthan paid challan amount of Rs 1,41,700 at Rohini court on September 9 for overloading the truck on September 5. pic.twitter.com/2P4G9JqDgR
— ANI (@ANI) September 10, 2019