“डिजिटल मार्केटिंगमध्ये युवकांना वाढती संधी’

लोणी काळभोर- आज पारंपरिक बाजाराबरोबरच ऑनलाइन म्हणजेच डिजिटल मार्केटिंगचा पसारा वाढत चालला आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांकडे ब्रॅंडेड वस्तू उपलब्ध होत असून, या क्षेत्रात करियर करण्याच्या संधी वाढल्या आहेत. जगातील कोट्यवधी लोक इंटरनेटशी जोडले गेले आहेत. अनेक कंपन्या डिजिटल मार्केटिंगमधून उत्पादनाची जाहिरात करताना दिसून येतात. म्हणूनच या क्षेत्रात गुणवंत उमेदवारांची गरज भासू लागली आहे. आपणही या क्षेत्रात करियर करून डिजिटल युगाचे भागीदार होऊ शकता, असे प्रतिपादन यॅनफेंग इंडिया ऑटोमोटिव्ह इंटिरियर सिस्टमचे अध्यक्ष वर्धन देवनाथन यांनी केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मिटकॉम) तर्फे आयोजित तिसऱ्या मार्केटिंग कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी एमआयटी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, डॉ. विवेक सिंग, डॉ. छब्बी सिन्हा उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×