रियाध – सौदी अरेबियाने करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेला देशव्यापी कर्फ्यू हटविला आहे. यामुळे येथील नागरिक आता मुक्त संचार करू शकणार आहे.
मात्र, तरीही येथील नागरिकांसाठी अजूनही अनेक प्रकारचे निर्बंध लागू आहेत. कर्फ्यू हटविल्यामुळे देशात आर्थिक आणि व्यावसायिक चक्र सुरू होणार. मात्र, आंतरराष्ट्रीय आणि धार्मिक पर्यटनावर अजूनही निर्बंध आहेत.
सौदी अरेबिया प्रशासनाने या वर्षी जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या हज यात्रेबाबतही महत्त्वाची घोषणा केलेली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने देशविदेशातील मुस्लीम बांधव हजसाठी आतापासूनच रवाना होतात. मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर देशोदेशींचे मुस्लीम बांधवांना हज यात्रेसाठी जाता येणार नाही.