पुणे : प्रभाग क्रमांक 34 सनसिटी – हिंगणे मध्ये 15 ते 18 या वयोगटासाठी सिंहगड रस्ता परिसरात वेगवेगळ्या ठिकणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत विश्रांतीनगर येथील महापालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीसह , वांजळे तलाव , सनसिटी . कुदळे पाटील ऍमिनेटी पेस माणिक बाग , हिंगणे येथील मनपाची हनुमंत जगताप शाळा , लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा ज्योती किशोर गोसावी यांच्या हस्ते करणात आले . डॉ. पुजा चौगुले , सोनी बलीड , अक्षय अहेर , दतात्रेय वाल्टे, श्री केतन निकम, योगीता फंड , अभिजीत कदम , बाळासाहेब आखाडे उपस्थित होते. दरम्यान, या परिसरात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने या भागातील मुलांच्या लसीकरणाला वेग येणार असून आणखी केंद्र वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका गोसावी यांनी यावेळी बोलताना सांगितले.