नवी दिल्ली – देशभरात सध्या करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. नवीन रुग्णांची वाढ झपाट्याने होत असताना दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सूचक इशारा दिला आहे.
वाढत्या रुग्ण संख्यावरून सध्या भारतील अनेक राज्यात चिंताजनक परिस्थिती आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येन्द्र जैन यांनी वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्याच बरोबर त्यांनी असा दावा केला आहे की ज्यांचे करोना संबधातील लसीकरणाचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांनी निश्चिती राहू नका. आपली काळजी घ्या. लसीकरण झाले असले तरीही करोना होऊ शकतो. कारण दिल्लीमधील एकूण लोकसंख्येपैकी १०० टक्के नागरिकांचा पहिला डोस झाला असून ७५ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला. परंतु दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये लसीकरण झालेल्यां रुग्णाची संख्या जास्ती आहे
दरम्यान सत्येंद्र जैन म्हणाले की, गेल्या वेळची लाट आणि यावेळची लाट यात मोठा फरक आहे. मागच्या वेळी 17 हजार केसेस आल्या तेव्हा हॉस्पिटलमध्ये अडीच हजार लोक रुग्णालयात दाखल होत होते. आता अॅडमिशन 200-300 आहे. पूर्वीपेक्षा खूपच कमी. दाखल झालेल्यांमध्ये असे अनेक रुग्ण आहेत जे इतर आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात आले आणि पॉझिटिव्ह आले. या लाटेत आतापर्यंत १७ मृत्यूची नोंद झाली असून मृतांमध्ये इतर आजार असणाऱ्यांचाच समावेश आहे.
तसेच सत्येन्द्र जैन यांना रुग्णालयांच्या व्यवस्थेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की सध्या दिल्लीत ५ हजार हेल्थ असिस्टंट/नर्सिंग स्टाफ सज्ज आहे. या सर्वांना करोना रुग्णांच्या उपचारसाठीची बेसिक ट्रेनिंग देण्यात आली आहे. एकूण बेडपैकी फक्त १० टक्के बेड सध्या वापरात असून अजून ९० टक्के बेड रिकामे असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.