मुंबई – बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमातआतादाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाइल्ड या कार्यक्रमात झळकणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात रजनीकांत यांचा मॅन व्हर्सेस वाइल्ड या शोमधील एपिसोड शूट होणार आहे. व्याघ्र संवर्धन प्रकल्पांतर्गत साली हे उद्यान स्थापन करण्यात आले.
दरम्यान, आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये थलायवा रजनीकांत यांनी विविध भूमिका साकारत भरपूर प्रसिद्धी मिळवली. केवळ दाक्षिणात्यच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांची क्रेझ पाहायला मिळते. आपल्या स्टाइलसाठी ते विशेष ओळखले जातात. मॅन व्हर्सेस वाइल्ड या शोमध्ये त्यांना पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत दोन वाघांचा सामना पाहायला मिळणार , अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रजनीकांत यांच्या बेअर ग्रिल्ससोबतच्या या एपिसोडविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.