पिरंगुट- भूगाव (ता. मुळशी) येथील वैशाली मनोहर सणस यांची मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात झाली. भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन सदावर्ते, जिल्हा सहकार आघाडी सरचिटणीस विलास चोंधे, जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस शरद भोते, तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, उपाध्यक्ष बाळासाहेब कुरपे, तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. वैशाली सणस या ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम पाहिले आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर सांगितले.