बीलावरुन ग्राहकांनी घातला होता राडा
पुणे,दि.24- शहराच्या मध्यवस्तीतील एका बारमध्ये बाऊंन्सर ग्राहकांच्या दिशेने गोळीबार केला. ग्राहकांनी बिलावरुन वाद घालत राडा करण्यास सुरवात केल्याने त्याने पिस्तूलातून एक गोळी झाडली होती. ही घटना वसंत बारमध्ये घडली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय नेते सदानंद शेट्टी यांचे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंत बार नावचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री तीन ग्राहक आले होते. यातील एकाचा मुलगा झाल्याने त्याने पार्टी करण्यासाठी सोबत दोन भावजी आणले होते. त्यांनी बारमध्ये अतीमद्यपान केले. यानंतर बील आल्यावर त्यांनी बीलावरुन कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरवात केली. हा वाद विकोपाला गेल्यावर प्रकरण हातघाईवर आले. यामध्ये तेथील बाऊंन्सरने मध्यस्थी करताच वाद आणखी चिखळला. सरतेशेवटी बाऊंन्सरने ग्राहकांच्या दिशेने एक गोळी झाडली.