माद्रिद : ला लीगा फुटबाॅल स्पर्धेमध्ये रियल माद्रिद आणि एटलेटिक बिलबाओ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. मागील १३ वर्षात पहिल्यांदा अस घडलंय की ‘ला लीगा’ मध्ये जिनेदिन जिदानचा संघ लागोपाठ दोन सामन्यात एकही गोल करू शकला नाही. यापूर्वी २००६ मध्ये अस घडल होतं.
Athletic stand firm to earn a point at the Bernabeu! 💪#RealMadridAthletic 0-0 pic.twitter.com/ns22lqRDwR
— LaLiga English (@LaLigaEN) December 22, 2019
मागील सामन्यात रियल माद्रिदने बार्सिलोना विरूध्दातील सामन्यात गोलशून्य बरोबरी केली होती.
सामन्यात रियल माद्रिदला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या पण त्याचं गोल मध्ये रूपातंर करण्यात त्यांना अपयश आल. त्यांचा आघाडीचा खेळाडू आणि टाॅप स्कोरर करीम बेंजेमाने देखील सामन्यात गोल करण्याच्या सात संधी गमावल्या.