सासवड – पुणे जिल्हा भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर वर्णी लागलेली आहे. या कार्यकारिणीची निवड जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी जाहीर केली, अशी माहिती पुरंदर तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
निवडीनंतर कार्याध्यक्ष निलेश जगताप व सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे श्रीकांत थिटे, प्रसाद आत्रे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
पुरंदर – कोरकमिटी सदस्य : माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब जाधवराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे. विशेष निमंत्रित सदस्य : रवींद्र फुले. कार्यकारिणी सदस्य : अलका शिंदे, वैशाली धसाडे. जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस : श्रीकांत ताम्हाणे. महिला आघाडी सरचिटणीस : तुजा जाधव, माजी सैनिक आघाडी सहसंयोजक दशरथ घोरपडे, प्रकाश भामे.
हवेली – ओबीसी सेल : पुणे जिल्हाध्यक्ष : सागर भूमकर, उपाध्यक्ष स्नेहल दगडे, राहुल शेवाळे. संयोजक वैद्यकीय आघाडी : बाळासाहेब हरपळे. जिल्हा कार्यकारणी सदस्य : संदीप हरपळ.